अशी कुणाची तरी कविता आहे. कुणाची तरी अशासाठी, की मला कवितेतलं ओ की ठो कळतनाही. कळलं,
तरी लक्षात राहत नाही. मग कशाला डोक्याला ताप घ्या? कुणाची तरी असंम्हटलं,
की सगळे प्रश्न मिटतात.
तर ते असो.
सांगण्याचा उद्देश हा, की सध्या पावसा पावसा कधी होशील रे पाऊस,
असं म्हणायची वेळआलेय.
यंदा भरपूर पाऊस होणार...मान्सून आला...
102 टक्के सरासरी गाठणार..जूनची सरासरीओलांडली...खंडीभर बातम्या लिहून,
वाचून आणि संपादित करून जूनच्या पहिल्यापंधरवड्यात भरपूर करमणूक झाली. या बातम्या वाचतानाच मनात शंकेची पाल चुकचुकतहोती.
चोर-दरोडेखोर जसे पेपरमधल्या बंदोबस्ताच्या बातम्या वाचून सावध होतात ना,तसाच पाऊस झाला तर?
पण स्वयंघोषित हवामानतज्ज्ञ सांगत होते, `गेल्या वर्षी दुष्काळहोता. म्हणजे यंदा पाऊस नक्की पडणार.
अगदी सरासरी ओलांडणार...' मग आमची तोंडंगप्प झाली.
पण व्हायचं तेच झालं. गेले पंधरा दिवस पाऊस वाकुल्या दाखवतोय. पुण्यात,
पुणे जिल्ह्यातजोरदार पाऊस पडून पाणी वगैरे भरल्याच्या बातम्या एखाद-दोन वेळाच वाचायला मिळाल्या.
त्यादेखील जूनच्या पहिल्या आठवड्यात. त्यातला निम्मा पाऊस तर मान्सूनचा नव्हताच...
ट्रेकला सुरुवात करायची म्हणून गेल्या रविवारी भातराशी ट्रेकला जाऊन आलो.पवनानगरच्या अगदी पावसाच्या पट्टयात. वाटलं,
पावसात चिंब भिजता येईल. पण कसलंकाय नि कसलं काय...
औषधालाही पाऊस नव्हता. एकदा धुक्याचं दर्शन झालं, तेवढंच.
काल खडकवासल्याला गेलो होतो. तिथेही पाऊस भेटला नाहीच.
साधे ढगसुद्धा सिंहगडाच्याटोकावरून खाली उतरायला तयार नव्हते.
गेल्या वर्षी पावसानं असंच कुथवलं होतं. जूनची पुण्यातली सरासरी ओलांडून गेली आणि मगपावसासारखा पाऊस काही पडलाच नाही. जुलै, आॅगस्टमध्ये थोडी भरपाई केली त्यानं, पणतेवढीच.
गेल्या वर्षी पाच जुलैला ताम्हिणीत गेलो होतो. नेहमीपेक्षा जरा लवकरच.
पुण्यातपावसाची फारशी लक्षणं नसल्यानं या ट्रिपविषयी जरा धाकधूकच मनात होती.
पण जातानाचएका छोट्या धबधब्यानं उत्साह वाढवला. नंतर तर रस्त्यावर आम्ही धुक्यात हरवून गेलो
आणि ताम्हिणीत फार नाही, पण आनंद घेण्याएवढे धबधबे मिळाले.
यंदा एवढ्यात ताम्हिणीत जायचा विचार नाहीये, पण पावसाची प्रतीक्षा मात्र आहे.
ताम्हिणीसह माळशेजही करायचा बेत आहे. बघूया. आधी पाऊस तर पडू दे.!
ताम्हिणीसह माळशेजही करायचा बेत आहे. बघूया. आधी पाऊस तर पडू दे.!
No comments:
Post a Comment